मंगळवार, डिसेंबर २९, २००९

ए फुलों की रानी


.
.
तू गोडी फुलांची, वसंताची राणी
तुझे हासणे तर कहर जाहले
हृदय मस्त झाले, मन डोलते गं
तुझे पाहणे तर कहर जाहले
.
तुझे ओठ म्हणजे गुलाबी कमळ ते
ही दोन पाने प्रेमाची गीते
या ओठांनी नाजुक नाजुकश्या गोष्टी
मला सांगणे तर कहर जाहले
.
कधी भेटणे मग लाजून पळणे
कधी वाट सोडून हसणे खिदळणे
किती पापण्यांची उघडझाप करणे
तुझे वागणे तर कहर जाहले
.
घन दाटती हे, थंडी पसरते
तुझ्या कुंतलांची कृपाच ठरते
प्रत्येक बट ही नशेचाच सागर
गुंतून जाणे तर कहर जाहले
.
.
-------------------
गीत: ए फुलों की रानी बहारॊं की मलिका
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: