मंगळवार, डिसेंबर २९, २००९

दिल आज शायर है


काळीज कवी झाले दुःखाची कविता गझल रात्र झाली प्रिये
इतरांच्या शब्दाना वा वा वा म्हणताना इकडे जरा लक्ष दे
.
येऊन बघ ना माझे जगणे तुझ्या मागे लागून कसे जाहले
अश्रूंच्या धाग्यांनी तू दिलेल्या जखमांना मी बांधले
राज्यात प्रेमाच्या दुःख तुझे घेऊन फसलो खुळा मी कसा
जग जिंकलो पण तुझा डाव हरलो का खेळ झाला असा?
.
जगतात कोठे उपमाच नाही माझ्या उत्कट प्रेमाला
यकःश्चित होतो प्रेमात तावून सूर्य तेज आले मला
माझ्यामुळे आहे विश्वास आणि आनंद या जगण्याला
जग मी नसताना वण वण वण धावेल प्रेमास शोधायला
.
हे खेळणे नाही हे प्रेम आहे हा खेळ चिव्वट खरा
माझ्या प्रमाणे आयुष्य जाळा मग कोणी हिम्मत करा
आम्ही प्रवासी कोण्या दिशेला आम्हा असे जायचे
लावून आलो जो डाव आम्ही जिंकूनच तो यायचे
.
.
-----------------------------
मूळ गाणे: दिल आज शायर है
गायक: किशोर कुमार
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: