शुक्रवार, डिसेंबर ३१, २०१०

आज ओठांनी सजावे वाटते गं - कतिल शिफाई

.

हा सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.

**

आज ओठांनी सजावे वाटते गं
ये तुला मी गुणगुणावे वाटते गं

नेमका अश्रू तुझ्या पदरी पडावा
थेंब ते मोती बनावे वाटते गं

पसरला अंधार वस्तीतून सारा
त्याच साठी घर जळावे वाटते गं

आठवावे आठवावे मी कितीदा
मी तुझ्या स्मरणात यावे वाटते गं

श्वास शेवटचा तुझ्या मांडीत जावा
काव्यमय हे मरण व्हावे वाटते गं

**

मूळ गझल: अपने ओठों पर सजाना चाहता हूँ
गझलकार: कतिल शिफाई
मराठी अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

**

मूळ गझल ::::::::

अपने होटोंपर सजाना चाहता हूं
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं

कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं

छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हूं

थक गया हूं करते करते याद तुझको,
अब तुझे मैं याद आना चाहता हूं

आखरी हिचकी तेरे जानों पे आए,
मौत भी मैं शाइराना चाहता हूं