बुधवार, जून २५, २००८

सांझ झाली कशी डोळे भरता

.

सांझ झाली कशी डोळे भरता
पुन्हा आहे तुझी कमतरता

मूठमाती दिल्याने येईल जीव
श्वास कधीचा अडकला अता

वेळ थांबत नाही कुठे बघ ना
माणसासारखा वागतो न चुकता

उरले ना काही नाते तरीही
निरोप तरी दे हसता ह्सता

~ गुलज़ार

मूळ गज़ल: शाम से आँख में नमीं सी है
गज़लकार: गुलज़ार
मराठी अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

मूळ गज़ल:

शाम से आँख में नमी सी है
आइये आप की कमी सी हैं

दफ्न कर दो हमें की साँस आए
नब्ज कुछ देर से थमी सी है

वक्त रहता नहीं कहीं छुपकर
इसकी आदस थी आदमी सी है

कोई रिश्ता नहीं रहा फिर भी
एक तसलीम लाज़मी सी है

~ गुलज़ार

गुरुवार, जून १९, २००८

माझ्या कवितांची प्रभा आहे जगासाठी

.

माझ्या कवितांची प्रभा आहे जगासाठी
काही कविता फक्त तिने ऐकण्यासाठी

संपविणे सर्व वेदना ही नव्हे ठीक
असतात काही वेदना सांभाळण्यासाठी

डोळ्यांमधे ओताल तर ती बोचतील ना
स्वप्ने असतात पापणीवर तोलण्यासाठी

पाहिले तुझे हात तेव्हा वाटले ते हात
मंदिरातले दीप फक्त लावण्यासाठी

केला विचार तर मोठी शरीर शुचीता
अन्यथा आहे फक्त आग विझवण्यासाठी

हे ज्ञान या गोष्टी हे उतारे ही पुस्तके
आठवणील्या प्रियाला विसरण्यासाठी

~ जानिसार अख्तर

मूळ गझल: अशार मेरे यूँ तो ज़माने के लिये हैं
शायर: जानिसार अख्तर
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
(शब्दगोडी जानिसार अख्तर साहेबांची आहे, शब्दचुका आणि अर्थदोष माझे आहेत हे समजावे)


-------------

मूळ गझल:

अशार मेरे यूँ तो ज़माने के लिये हैं
कुछ शेर फ़क़त उनको सुनाने के लिये हैं

अब ये भी नहीं ठीक कि हर दर्द मिटा दें
कुछ दर्द कलेजे से लगाने के लिये हैं

आँखों में जो भर लोगे तो कांटों से चुभेंगे
ये ख़्वाब तो पलकों पे सजाने के लिये हैं

देखूँ तेरे हाथों को तो लगता है तेरे हाथ
मंदिर में फ़क़त दीप जलाने के लिये हैं

सोचो तो बड़ी चीज़ है तहज़ीब बदन की
वरना तो फकत आग बुझाने के लिये हैं

ये इल्म का सौदा ये रिसाले ये किताबें
इक शख़्स की यादों को भुलाने के लिये हैं

~ जानिसार अख्तर