शनिवार, मे १७, २००८

तडप तडप के इस दिल को...

.
.
निष्प्राण आयुष्याला
तू संजिवन दिले
पण तुझ्या प्रेमातच
हृदय हे खंगले

तुटता तुटता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

अजब हे प्रेम सखये
सुख हे दो घडीचे
भरभरून दुःखाचा पाऊस
अंधार एकटेपणाचे
कधी रडतो कधी चिडतो
कधी खचतो कधी कुढतो
तुझा चेहरा दिसतो गं
तुझा चेहरा दिसतो गं
मला दिवसा प्रकाशात
तुझी स्मरणे छळतात
तुझी स्मरणे छळतात
रात्रीच्या अंधारात
तुझा चेहरा दिसतो गं
झुरता झुरता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

देव भेटला तो
विचारेन का रे?
मातीचा पुतळा घडवला
काचेचे हृदय कशाला रे?
आणि त्याला दिली हिम्मत
प्रेमातच पडण्याची
बघतो तू कशी गम्मत
बघतो तू कशी गम्मत
नशिबाने मीलनाची
विरहाची ही करामत
विरहाची ही करामत
प्रेमाची अशी किम्मत
बघतो तू कशी गम्मत
हुंदक्यातच
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

-----------------------------------------------------------------------------------
गीत: तडप तडप के इस दिल को
चित्रपट: हम दिल दे चुके सनम
गायक: डोमिनिक
संगितकार: इस्माईल दरबार
गीतकार: मेहबूब
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
-----------------------------------------------------------------------------------


http://www.esnips.com/doc/685af37e-8024-4264-b3c1-94a8338b6e80/44-Tadap-Tadap-Ke

या रब्बा दे दे कोई जान भी अगर

.
.
प्रीत की भोग हा सांग ना रे मना
वाढते का अशी प्रीतीची वेदना
प्रीतीसाठी कितीदा परिक्षा द्यायच्या
ही प्रीत गिरवते रोज कहाण्या या अशा
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
कुठे रसता मनांच्या जुळण्याचा
सोडवू कसा पीळ हा नशिबाचा
हदया मध्ये रुसवे साचले
माझे सुख ही मजला बोचले
कण्हते कुणी कुणी गा-याणे सांगते
मृगजळ पाहूनिया सैरभैर कुणी धावते
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
ऐकते ना कुणी निश्वासांना
आधार कुठे आर्जवी बाहूंना
अरधी मुरधी इच्छा बापुडी
तुटकी फुटकी स्वप्नांची जुडी
संशय कुठे कुठे द्वेषाचे घोळके
यश येता मागुन अपयश होते बोलके
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
विचारू नका वेदनावंतांना
सुख कसले हसणे कसले
संकट डोईवर राहतेच
कधी कसले कधी कसले
.
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
----------------------------------
गीत: या रब्ब दे दे कोई जान भी अगर
चित्रपट: सलामे इश्क
संगीत: शंकर एहसान लॉय
गायक: कैलाश खेर
गीतकार: समीर
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
----------------------------------
.
.
यू ट्यूब: http://www.youtube.com/watch?v=5tz8TBZogEw
मूळ गीत: http://www.lyricsmasti.com/song/2111/get_lyrics_of_Ya-Rabba.html