शुक्रवार, नोव्हेंबर २४, २००६

कळेना लोक प्रेम करती का

कळेना लोक प्रेम करती का?
त्यांची हृदये कुणावर जडती का?
कळेना का? ऽ ऽ कळेना का?
कळेना का? कळेना का? कळेना का?

प्रेम म्हणजे एक डोंगर दुःखाचा
नित्य मागे भार लागे कष्टाचा
प्रेमामध्ये लागणार वाकावे
दुःख लपवुन हासण्याचे देखावे
विष जगण्यात कालवती का?
कळेना लोक प्रेम करती का?
कळेना का? ऽ ऽ कळेना का?
कळेना का? कळेना का? कळेना का?

प्रीतीविण रस नाही जगण्यात
एकटा तो, न जो, प्रेमात
प्रेम सगळे बहुरंगी करते
प्रेम आयुष्य छान नटविते
लोक आतुन प्रीत करती का?
कबुल करण्यास नाहक भीती का?
कळेना का? ऽ ऽ कळेना का?
कळेना का? कळेना का? कळेना का?

प्रेम वैताग जगण्याला नसता
प्रेम निर्मळ सात्विक सुंदरता
प्रेमापाई गरगरते डोके
प्रेमाची सुंदर सगळी रूपे
प्रीत सागर जे उतरती हो
नेमके बुडती ना तरंगती हो
प्रेम करती सगळे आतुन
किती लपवाल खोटे बोलून
कळेना का? ऽ ऽ कळेना का?
कळेना का? कळेना का? कळेना का?


चित्रपटः दिल चाहता है
गायकः उदित नारायण, अलका याग्निक
मूळ गाणेः जाने क्यों लोग प्यार करते हैं
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर