गुरुवार, डिसेंबर ३१, २००९

नीला आसमाँ सो गया

आकाश निळे झोपले
आकाश निळे झोपले

दव बरसते, रात्र भीजते, ओठ थरथरती
सांगावेसे वाटते पण शब्द ना फुटती
एकांती, मीच आणिक तू
कसा गप जाहला ऋतू

मिठी मध्ये अशी लाजून तू आलीस हलक्याने
कुशीमध्ये ढगांच्या लाजुनी जणु जावे चंद्राने
हवेचा ताल हळवासा
थबकला काळ थोडासा

-------------------------------------
चित्रपट: सिलसिला
गीत: नीला आसमाँ सो गया
गीतकार: जावेद अख्तर
गायक: अमिताभ बच्चन
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

मंगळवार, डिसेंबर २९, २००९

फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ

हवेत धुंद गारवा नशा दिशादिशातुनी
पहा निसर्ग सांगतो, कशी कथा सुनी सुनी

वसंत हाक मारतो, दूरून त्या फुलांतुनी
गळून रंग चालले, कुणाचि वाट पाहुनी
मधेच लाट सांगते, वचन दिले कसे कुणी

मिटूनही मिटेचना, अशी कशी तहान गं
मिळूनही मिळेचना कसा जिवास प्राण गं
फिरून ऊन सावली फिरूनही व्यथा सुनी

असाच काळ शोधता मधेच काळ संपतो
पुरा खट्याळ काळ तो, अधीर भेट काळ तो
निघे कठोर काळ खूण काळजात कोरूनी

चित्रपट: निकाह
गीतकार: हसन कमाल
मूळ गीत: फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ
गायिका: सलमा अाग़ा
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

मैं अगर कहूं


.
.
तू मिळाली आणि हारवलो मी
तुला तरी कसे ग आज सांगू मी
भाषेत कोणत्या तो शब्द मिळेना
शब्दात तुझी गोडी कशी आणू मी
मी म्हणालो या सौंदर्याला
जगामधे कुठे नाही उपमा
स्तुती तरी तुझी पुरी झालीच ना
.
तारूण्याचे गोड वारे
चेह~यावरूनी वाहते ग
केसांची घनदाट छाया
हृदयाला वेड लावते गं
पदर तुझा ढळतो
मेघ जसा जळतो
मीठीत घेऊनी जसं चांदणं
रूपाचं चांदणं
.
मी म्हणालो हा लाघवीपणा
कुठे नाही अन कुठे होईल ना
स्तुती तरी तुझी पुरी झालीच ना
.
तू मिळाली आणि हारवलो मी
.
लावला जीव तू
बदलला हा ऋतू
आता माझी तुझी
वाट एक आहे रे
तू जिथे मी तिथे
.
मी म्हणालो जर सखीला जरा
परी आहे तू की कोणी अप्सरा
स्तुती तरी तुझी पुरी झालीच ना
.
.
-------------------
गाणे : मैं अगर कहूं
गायक : सोनू निगम अणि श्रेया गोशाल.
संगीतकार : विशाल शेखर
चित्रपट : ॐ शांति ॐ
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

ए फुलों की रानी


.
.
तू गोडी फुलांची, वसंताची राणी
तुझे हासणे तर कहर जाहले
हृदय मस्त झाले, मन डोलते गं
तुझे पाहणे तर कहर जाहले
.
तुझे ओठ म्हणजे गुलाबी कमळ ते
ही दोन पाने प्रेमाची गीते
या ओठांनी नाजुक नाजुकश्या गोष्टी
मला सांगणे तर कहर जाहले
.
कधी भेटणे मग लाजून पळणे
कधी वाट सोडून हसणे खिदळणे
किती पापण्यांची उघडझाप करणे
तुझे वागणे तर कहर जाहले
.
घन दाटती हे, थंडी पसरते
तुझ्या कुंतलांची कृपाच ठरते
प्रत्येक बट ही नशेचाच सागर
गुंतून जाणे तर कहर जाहले
.
.
-------------------
गीत: ए फुलों की रानी बहारॊं की मलिका
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

रूठकर हमसे कभी


.
.
रागावून माझ्यावर, चालला जाशिल कधी
वाटले नव्हते मला, इतका आठवशिल कधी
.
तुझ्याविन पडली ना दोन सुद्धा पाऊले
वेडा खुळा होतो नाहि इतके कळले
मला सोडून तू असा वेगळा होशील कधी
वाटले नव्हते मला, इतका आठवशिल कधी
.
शव्दांनी हातांनी किती छळले रे तुला
मस्ती मधे नेहमी नाही कळले रे मला
काय हरवेल माझे जेव्हा दूर होशिल कधी
वाटले नव्हते मला, इतका आठवशिल कधी
.
.
-------------------------
गीत: रूठकर हमसे कभी
चित्रपट: जो जिता वही सिकंदर
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

मुसाफिर हूँ यारो


.
.
प्रवासी मी आहे
मला घर ना दार
पुढे जात रहायचे
बस रहायचे
.
एक वाट थांबली
एक भेटली
चाललो वळून मी
ही वाट वाकली
हवेच्या कडेवर
घरटे करायचे
.
दिवसाने आग्रहाने
जवळ बसविले
रात्रीने खुणेने मला
पुढे ओढले
दिवसाला व रात्रीला
मित्रच म्हणायचे
.
.
--------------
गीत: मुसाफिर हूँ यारो
चित्रपट्: परवरिश
गायक: किशोर कुमार
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

कहीं दूर जब दिन ढल जाये


.
.
दूर दिनप्रभा जशी मावळते
सांजबावरी लाजत येते, दबकत येते
अंगणात माझ्या हृदयाच्या
स्वप्नदिवे कुणी लावत जाते, लावत जाते
.
अचानक हृदयात धडधड झाली
अचानक बघा माझी पापणी ओली
कुणी तरी प्रेमळ स्पर्षाने
दिसले नाही पण, जवळच होते, जवळच होते
.
कधी कधी हृदयांची भेट ना होते
कधी कधी जुळते रे जन्मांचे नाते
कमाल म्हणजे, मन माझे तरी
परदुःखाने घायाळ होते, घायाळ होते
.
हृदयात लपलेले गुपित हे खोल
सोनेरी ओढली मी स्वप्नांची शाल
ही माझी स्वप्ने, यांचीच आशा
तुटणार नाही माझे, सोनेरी नाते, सोनेरी नाते
.
दूर दिनप्रभा जशी मावळते
सांजबावरी लाजत येते, दबकत येते
अंगणात माझ्या हृदयाच्या
स्वप्नदिवे कुणी लावत जाते, लावत जाते
.
.
--------------------------
मूळ गीत: कहीं दूर जब दिन ढल जाये
गायक: मुकेश
चित्रपट: आनंद
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

दिल आज शायर है


काळीज कवी झाले दुःखाची कविता गझल रात्र झाली प्रिये
इतरांच्या शब्दाना वा वा वा म्हणताना इकडे जरा लक्ष दे
.
येऊन बघ ना माझे जगणे तुझ्या मागे लागून कसे जाहले
अश्रूंच्या धाग्यांनी तू दिलेल्या जखमांना मी बांधले
राज्यात प्रेमाच्या दुःख तुझे घेऊन फसलो खुळा मी कसा
जग जिंकलो पण तुझा डाव हरलो का खेळ झाला असा?
.
जगतात कोठे उपमाच नाही माझ्या उत्कट प्रेमाला
यकःश्चित होतो प्रेमात तावून सूर्य तेज आले मला
माझ्यामुळे आहे विश्वास आणि आनंद या जगण्याला
जग मी नसताना वण वण वण धावेल प्रेमास शोधायला
.
हे खेळणे नाही हे प्रेम आहे हा खेळ चिव्वट खरा
माझ्या प्रमाणे आयुष्य जाळा मग कोणी हिम्मत करा
आम्ही प्रवासी कोण्या दिशेला आम्हा असे जायचे
लावून आलो जो डाव आम्ही जिंकूनच तो यायचे
.
.
-----------------------------
मूळ गाणे: दिल आज शायर है
गायक: किशोर कुमार
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

जिंदगी..कैसी है पहेली ये हाये

.
.
जीवना..तू आलेस एक कोडे
कधी हसण्याचे, कधी रडण्याचे
जीवना...
.
कधी कधी मन वेडे होई, स्वप्नांच्याच मागे जाई
अचानक मागे मागे जाता, जाई स्वप्नांच्याही पलीकडे
जीवना..
.
सोबत दिवस घालवीले, सुख दुःखास जवळ केले
ती करती मीक यात्रा, या जगण्याच्या ही पलिकडे
जीवना..
.
.
--------------------------
चित्रपट: आनंद
गायक: मन्न डे
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

होठों से छुलो तुम

.
.
ओठांनी चुंबुन घे, कर माझे गीत अमर
बन माझी प्रियतम तू, कर माझे प्रित अमर
.
सीमाच वयाची नको, जन्माचे नको बंधन
प्रेमाने जडताना, जोडावे केवळ मन
नवी रीत घडव आता, होवो ती रीत अमर
बन माझी प्रियतम तू, कर माझे प्रित अमर
.
शून्यत्व नभाचे या, एकाट हृदयी माझ्या
पैजणे वाजवीत ये, तू हळुच जगी माझ्या
कर अपुल्या श्वासांनी, माझे संगीत अमर
बन माझी प्रियतम तू, कर माझे प्रित अमर
.
मज आवडले जे जे, हरवून इथे गेले
मी हरलो जगताना, जग हे जिंकत गेले
तू हरून हृदय अपुले, कर माझी जीत अमर
बन माझी प्रियतम तू, कर माझे प्रित अमर
.
.
गायक: जगजीत सिंग
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

हसता हुआ नूरानी चेहरा

.
.
हसणारा तेजस्वी चेहरा
काले केस नि रंगही गोरा
नव यौवन हे तौबा तौबा
जिवलगा जिवलगा
.
प्रथम तुझ्या डोळ्यांनी
घात केला लांबूनच
गर्वनटीत नजरेने
कहर केला थांबूनच
तुला रे वेड्या काय ठाऊक रे
गोड खेळ हृदयातला
.
मनभरून त्रास दे रे
वार मनभरून कर
सगळे कबूल आहे जर
प्रीत मोहरून कर
तू असताना रोग माझा
वाढतो रे हृदयातला
.
.
गीत: हसता हुआ नूरानी चेहरा
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

ये हौसला कैसे झुके

.
.
.
माझी हिम्मत तुटणे नाही
माझी इच्छा विटणे नाही
.
रस्ता खडतर असुदे
क्षितिजी वादळ असुदे
सोबत पोकळ असुदे
हो हो
.
काटे असले मार्गी जरी
चालायचे तर आहे पुन्हा
सूर्य गिळला संध्येने जरी
रात्र संपणारच आहे पुन्हा
.
हे ही दिन जातील
हिम्मत फळ देईल
पहाट उजाडेल
हो हो
.
पाठीवरी तो हात हवा
रणरण विझवेल त्याची सावली
एकच माझी आहे प्रार्थना
कडेवर घेवो ध्येयाची माउली
.
जिद्द अपार असो
आग्रही होकार असो
प्रीत लाचार नसो
हो हो
.
माझी हिम्मत तुटणे नाही
माझी इच्छा विटणे नाही
.
स्वैर मराठी अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
.
गीत: ये हौसला कैसे झुके
गीतकार: मीर अली हसन
सगीतकार: सलीम सुलैमान
चित्रपट: डोर

मेरी और उनकी निगाहों के सायें


---------------------------------------------------------
चित्रपटः प्रेम परबत
गायिकाः लता मंगेशकर
---------------------------------------------------------
.
तुझ्या पाहण्याची, निराळीच भाषा
गुलाबी मीठीची, सुगंधीत भाषा
.
गिरींतून उमटे, किरणांचे ओठ
हवा फिरविते रे, नदीतून बोट
हवीशी हवीशी, ही ओठांची भाषा
.
बिलगतात झाडांना, ढग काळे काळे
क्षणातून छाया, प्रकाशाचे जाळे
किती शांत शीतल, दिशांची ही भाषा
.
मनसोक्त आश्वस्त, मन वागते रे
जसे मुक्त वारे, आकाश सारे
प्रीत रंगलेली, जगाचीच भाषा
.
---------------------------------------------------------
स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर

किसी की मुस्कुराहटों पे, हो निसार

.
मूळ हिंदी गीत: शैलेंद्र
संगीत: शंकर जयकिसन
गायक: मुकेश
चित्रपट: अनाडी
भूमिका: राज कपूर, नूतन
.
किसी की मुस्कुराहटों पे
.
किसी की मुस्कुराहटों पे, हो निसार ।
किसी का दर्द मिल सके, तो ले उधार ।।
किसी के वास्ते हो, तेरे दिल में प्यार ।
जीना इसी का नाम हैं ।। धृ ।।
.
माना, अपनी जेब से फकीर हैं ।
फिर भी यारों, दिल के हम अमीर हैं ।।
मिटे जो प्यार के लिये, वो जिन्दगी ।
जले बहार के लिये, वो जिन्दगी ।।
किसी को हो न हो, हमें तो ऐतबार ।। १ ।।
.
रिश्ता दिल से, दिल के ऐतबार का ।
जिन्दा हैं हमीं से, नाम प्यार का ।।
के मर के भी, किसी को याद आयेंगे ।
किसी की आँसुओं में, मुस्कुरायेंगे ।।
कहेगा फुल, हर कली से, बार बार ।। २ ।।
.
--------------------------------------------
.
कुणाचे हासणे बघून
.
कुणाचे हासणे बघून हो वेडा ।
मिळेल जर कुणाची तर तू घे पिडा ॥
कुणाप्रती मनात प्रीत केवडा ।
जगणे याला म्हणायचे ॥ धृ ॥
.
गरीब मी जरी परिस्थितीमुळे ।
श्रीमंत मी विशाल काळजामुळे ॥
प्रीत सागरामधे बुडायचे ।
वसंत आस लावुनी झुरायचे ॥
कुणा नसो मला विश्वास एवढा ॥ १ ॥
जगणे याला म्हणायचे...
.
नाते हे मनामनातुनी जुळे ।
प्रीत या जगात आमच्यामुळे ॥
मरूनही कुणास आठवेन मी ।
फिरून पापणीत आढळेन मी ॥
म्हणे कळी कळीस केवडा ॥ २ ॥
जगणे याला म्हणायचे...
.
मराठी अनुवादः तुषार जोशी, नागपूर २००६०३२२

------------------------------------------

दो दिल मिल रहे हैं

.
.
हृदये भेटली रे, परंतु लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
श्वासांची कशी घालमेल, डोळ्यात किती जागणे
कधी कधी हृदय हरवता, मन कुठे ना लागणे
रोमांचित मी पुरा जाहलो, जादू मध्ये पुरा नाहलो
कोणी करित आहे, जादू लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
हृदये भेटली रे, परंतु लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
किती निरागस भासवावे, जसे काही घडले नाही
रात नाही दिवसाहे आता, कुठे काही लपले नाही
काही नाही म्हणता जरी, ओठही झाले गप्प तरी
नजरा विणत आहे, सेतु लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
हृदये भेटली रे, परंतु लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
आग लागण्याच्याही आधी, धूर दिसतो सर्वांना
जसे तिकडे घडत आहे, दिसते इथे घडतांना
हृदयी हुरहुर अशी लागली, पटकन दोन्ही कडे जागली
एकदा पाहुनच रे, घे तू लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
हृदये भेटली रे, परंतु लपुनी छपुनी
सर्वांना कळत आहे, हेतु लपुनी छपुनी
.
-------------------------------------------------
चित्रपटः परदेस
गायकः कुमार सानू
मूळ गाणेः दो दिल मिल रहे हैं
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर

लागा चुनरी मे दाग...

.
.
माझ्या ओढणीचा डाग
मी झाकू कशी गं
घरी जाऊ कशी गं
.
मळली कायम ओढणी माझी
स्वच्छ तनूसम ओढणी माझी
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
पाठवणीची वचने विसरले
सासरच्या ढंगात हरवले
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
ओढणी म्हणजे आतमा माझा
डाग मोहाचा डाव
त्या गावाला माहेर माझे
सासर चे हे गाव
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
--------------------------------------
.
चित्रपट: दिल ही तो है
संगीत: रोशन
साल: १९६३
गायक: मन्ना डे
.
मराठी स्वैर अनिवाद: तुषार जोशी, नागपूर
.
--------------------------------------