मंगळवार, डिसेंबर २९, २००९

लागा चुनरी मे दाग...

.
.
माझ्या ओढणीचा डाग
मी झाकू कशी गं
घरी जाऊ कशी गं
.
मळली कायम ओढणी माझी
स्वच्छ तनूसम ओढणी माझी
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
पाठवणीची वचने विसरले
सासरच्या ढंगात हरवले
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
ओढणी म्हणजे आतमा माझा
डाग मोहाचा डाव
त्या गावाला माहेर माझे
सासर चे हे गाव
मी आता बाबाच्या सामोरि जाऊ कशी गं
घरी जाऊ कशी गं
माझ्या ओढणीचा डाग...
.
--------------------------------------
.
चित्रपट: दिल ही तो है
संगीत: रोशन
साल: १९६३
गायक: मन्ना डे
.
मराठी स्वैर अनिवाद: तुषार जोशी, नागपूर
.
--------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: