मंगळवार, डिसेंबर २९, २००९

कहीं दूर जब दिन ढल जाये


.
.
दूर दिनप्रभा जशी मावळते
सांजबावरी लाजत येते, दबकत येते
अंगणात माझ्या हृदयाच्या
स्वप्नदिवे कुणी लावत जाते, लावत जाते
.
अचानक हृदयात धडधड झाली
अचानक बघा माझी पापणी ओली
कुणी तरी प्रेमळ स्पर्षाने
दिसले नाही पण, जवळच होते, जवळच होते
.
कधी कधी हृदयांची भेट ना होते
कधी कधी जुळते रे जन्मांचे नाते
कमाल म्हणजे, मन माझे तरी
परदुःखाने घायाळ होते, घायाळ होते
.
हृदयात लपलेले गुपित हे खोल
सोनेरी ओढली मी स्वप्नांची शाल
ही माझी स्वप्ने, यांचीच आशा
तुटणार नाही माझे, सोनेरी नाते, सोनेरी नाते
.
दूर दिनप्रभा जशी मावळते
सांजबावरी लाजत येते, दबकत येते
अंगणात माझ्या हृदयाच्या
स्वप्नदिवे कुणी लावत जाते, लावत जाते
.
.
--------------------------
मूळ गीत: कहीं दूर जब दिन ढल जाये
गायक: मुकेश
चित्रपट: आनंद
स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: