शनिवार, मे १७, २००८

तडप तडप के इस दिल को...

.
.
निष्प्राण आयुष्याला
तू संजिवन दिले
पण तुझ्या प्रेमातच
हृदय हे खंगले

तुटता तुटता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

अजब हे प्रेम सखये
सुख हे दो घडीचे
भरभरून दुःखाचा पाऊस
अंधार एकटेपणाचे
कधी रडतो कधी चिडतो
कधी खचतो कधी कुढतो
तुझा चेहरा दिसतो गं
तुझा चेहरा दिसतो गं
मला दिवसा प्रकाशात
तुझी स्मरणे छळतात
तुझी स्मरणे छळतात
रात्रीच्या अंधारात
तुझा चेहरा दिसतो गं
झुरता झुरता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

देव भेटला तो
विचारेन का रे?
मातीचा पुतळा घडवला
काचेचे हृदय कशाला रे?
आणि त्याला दिली हिम्मत
प्रेमातच पडण्याची
बघतो तू कशी गम्मत
बघतो तू कशी गम्मत
नशिबाने मीलनाची
विरहाची ही करामत
विरहाची ही करामत
प्रेमाची अशी किम्मत
बघतो तू कशी गम्मत
हुंदक्यातच
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची

-----------------------------------------------------------------------------------
गीत: तडप तडप के इस दिल को
चित्रपट: हम दिल दे चुके सनम
गायक: डोमिनिक
संगितकार: इस्माईल दरबार
गीतकार: मेहबूब
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
-----------------------------------------------------------------------------------


http://www.esnips.com/doc/685af37e-8024-4264-b3c1-94a8338b6e80/44-Tadap-Tadap-Ke

1 टिप्पणी:

सारंग भणगे म्हणाले...

Jabaradast. Atishay surekh aani vaachaniiya translation ahe. pan tarihi tyat svathachi prachand creativity ahe.